नवग्रह रत्ने व रुद्राक्ष
माणिक रत्न
माणिक हे रवी ग्रहाचे रत्न आहे. सिंह राशी वाले हे रत्न धारण करू शकतात. हे रत्न धारण केल्याने धाडस वाढते. मानसन्मान मिळतो, नोकरीत बढती मिळते. हृदय विकारावर उपयोगी, वडिलांशी संबंध सुधारतात.
मोती रत्न
मोती हे रत्न कर्क राशीचे आहे. हे रत्न धारण केल्याने मनशांती मिळते, चिडखोरपणा कमी होतो, आईशी संबंध सुधारतात, पित्तविकार कमी होतो, स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास कमी करतो, उच्च रक्तदाबावर उपयोगी आहे.
पोवळे रत्न
पोवळे हे रत्न मेष व वृश्चिक राशीचे आहे. धाडस निर्माण करते, मनातील भीती दूर करते, मुलांना दृष्ट लागत नाही, भावंडांशी संबंध सुधारतात, पत्रिकेतील मंगल दोष दूर करते, खेळाडू साठी उपयोगी आहे. ज्यांच्या वरील राशी आहेत किंवा वरील प्रकारे फळ प्राप्ती साठी वापरू शकता
पाचू रत्न
पाचू हे रत्न मिथुन व कन्या राशीचे आहे. हे रत्न धारण केल्याने बुद्धिमत्ता वाढते नैराश्य दूर करते, व्यापारात फायदा होतो, मन एकाग्र होते, जीवनात उत्साह वाढतो शिक्षणात यश मिळते, लक्ष्मी व सरस्वती प्राप्त होते पित्त व पंडू रोगावर उपयोगी आहे. ज्यांच्या वरील राशी असतील, व ज्यांना वरील प्रकारचे फळहवे असेल त्यांनी हे रत्न धारण करावे
पुखराज रत्न
पुखराज हे धनु आणि मिन राशीचे रत्न आहे. विवाह योग्य जुळून येण्यासाठी, संतती प्राप्त होण्यासाठी, पती पत्नी मधील मतभेद दूर होतात, धार्मिक वृत्ती वाढते, ऊच्च शिक्षणात यश मिळते, नोकरीत प्रमोशन मिळते, यश, कीर्ती मिळते, आम्लपित्त व कावीळ वर उपयोगी आहे
हिरा रत्न
हिरा हे रत्न वृषभ आणि तुळ राशीचे आहे. शुक्र ग्रहाचे रत्न आहे. धारण केल्याने वैवाहिक सौख्य लाभते, तंत्र, मंत्र, भूतबाधा होत नाही. वीर्यवृद्धी, सौंदर्यवृद्धी, कलाक्षेत्रात यश, कलाकार व्यक्तींना लाभदायक आहे. मधुमेह आणि मुळव्याध यावर उपयोगी.
नीलम रत्न
नीलम मकर आणि कुंभ राशीचे रत्न आहे. या रत्नावर शनीचा अंमल आहे. हे रत्न धारण केल्याने मनातील भीती दूर होते, भूतबाधा, करणी बाधा, भाना मती अशा प्रकारांपासून रक्षण होते, लोखंडाचे व्यापार करणाऱ्यांना लाभदायक, शनीच्या साडेसातीमध्ये किंवा शनी महादशेमध्ये उपयोगी, गुडघेदुखी, दमा व संधिवात या आजारावर लाभदायक आहे.
गोमेद रत्न
गोमेद हे राहू ग्रहाचे रत्न आहे. हे रत्न धारण केल्याने शत्रूंचा बिमोड होतो, पूर्वजन्मीची पापे नष्ट होतात, परदेश गमन योग जुळून येतो, पोलीस खाते, जुगारी, दारू धंदेवाले यांना लाभदायक. चर्मरोग, मूळव्याध, मूत्रविकार व मधुमेह यावर उपयोगी आहे. ज्यांना राहू चा त्रास किंवा राहू महादशा असेल त्यांनी हे रत्न धारण करावे.
लसण्या रत्न
लसण्या हे रत्न केतू ग्रहाचे आहे. हे रत्न धारण केल्याने पिशाच्च बाधा दूर होते, संतती सुख लाभते, मन शांती लाभते, धैर्य व शौर्य जागृत होते उत्साह वाढतो. मुळव्याध व मधुमेह यावर उपयोगी आहे. आळस दूर होतो. ज्यांना केतू ग्रहाची महादशा असेल त्यांनी हे रत्न धारण करावे.
फिरोजा रत्न
बुध, गुरु, शुक्र, शनि या चारही ग्रहांचे लाभ देणारे हे एकमेव रत्न आहे. प्रसिद्धी लौकीक संपन्नता, पती - पत्नी मधील नाते दृढ करते. उत्पन्न वाढवते, वकील, शिक्षक, प्राध्यापक, कर सल्लागार, व्यापारी, कथाकार किर्तनकार या सर्वांनी हे रत्न वापरल्यास लाभ होतील. हे रत्न धारण करणारी व्यक्ती आर्थिक क्षेत्रात डबघाईला जात नाही जीवनातसकारात्मकता देण्याचं काम फिरोजा उत्तम प्रकारे करतो. ताणतणावातून बाहेर काढण्याचे कामी फिरोजा गुणकारी आहे.
सनस्टोन सूर्य रत्न
सनस्टोन सूर्य ग्रहाचे उपरत्न आहे. हे रत्न शारीरिक, मानसिक तणाव दूर करते, नौकरीत बढती, जीवनात सुख-सुविधा मिळतात, नजरदोष होत नाही, राजकारणी लोकांना फायदा होतो, पती सौख्य मिळते व्यवसाय वाढीसाठी अत्यंत उपयोगी आहे
टायगर रत्न
टायगर हे रत्न धाडस वाढवण्यासाठी, आत्मविश्वास येण्यासाठी, झोप शांत लागण्यासाठी, बिझनेस साठी, नजर दोषासाठी व वाईट विचार लांब ठेवण्यासाठी आपण वापरू शकतो
हकिक सूर्य रत्न
हकिक रत्नाने शरीरातील हाडे मजबूत होतात. खांदे व मान यांचे दुखणे दूर होते. शरीर संतुलित राहते लोकप्रियता वाढते. भीती दूर होते. कॉन्फिडन्स वाढतो. नजर लागत नाही. भूत, प्रेत, करणी ई. बाधा होत नाही. हे रत्न चांदीच्या अंगठी मध्ये करून उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये धारण करावे.
ओपल रत्न
ओपल रत्न शुक्राचे उप रत्न आहे. परंतु हिऱ्या पेक्षा हे रत्न श्रीयांसाठी चांगले आहे. सुख, समृद्धी, प्रेम, माधुर्य वाढवते. नवरा बायको मधील संबंध सुधारतात, मानशीनक स्थिती सुधारते, मनामध्ये उत्साह निर्माण करते . व्यापारात प्रगती होते, नजर दोष लागत नाही. कोणीही हे रत्न धारण करू शकते. चांदीच्या अंगठीत तयार करून अनामिकेत घालावे.
एक मुखी रुद्राक्ष
एक मुखी रुद्राक्ष धारण केल्याने आत्मविश्वास वाढतो, हृदयासंबंधित रोग दूर होतात, मानसन्मान मिळतो, आपल्या पत्रिकेतील सूर्य बळकट होतो, राजकारणात यश मिळते, विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे, शिवकृपा प्राप्त होते .
दोन मुखी रुद्राक्ष
दोन मुखी रुद्राक्ष, शिव पार्वती नावाने ओळखला जातो मनातील इच्छा पूर्ण होतात, कामात यश मिळते, पती-पत्नी, पिता-पुत्र, गुरु-शिष्य, प्रेमी-प्रेमिका यांच्या संबंधात सुधारणा होते, चंद्र ग्रहाचे दोष दूर होतात, दुःख दूर होते, शिव कृपा प्राप्त होते, मनशांती लाभते
तीन मुखी रुद्राक्ष
तीन मुखी रुद्राक्ष धारण केल्याने सर्व शत्रूंचा नाश होतो. रक्त विकार धूर होतात. ज्यांना मंगळ दोष आहे त्यांनी धारण करावा. याची देवता अग्नी आहे . रुद्राक्ष धारण केल्याने शिवकृपा प्राप्त होते .
चारमुखी रुद्राक्ष
चारमुखी रुद्राक्ष ज्ञान, एकाग्रता वाढवतो व्यापारात यश मिळते, जीव हत्येचे पाप नष्ट होते, चार वर्ण चार आश्रम आणि चार पुरुषार्थ याचं प्रतिनिधित्व करतो, नास्तिक मनुष्य आस्तिक होतो, अध्यात्मिक प्रगती होते बुध ग्रहाचे दोष नाहीशे करतो, याची देवता ब्रह्म आहे. रुद्राक्ष धारण केल्याने शिव कृपा प्राप्त होते.
पंचमुखी रुद्राक्ष
पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने आध्यात्मिक शक्ती वाढते, शारीरिक शक्ती वाढते, मानसिक शक्ती वाढते, गुरु ग्रहाचे दोष दूर होतात, कार्तिकेय देवता आहे, शिवकृपा प्राप्त होते.
सहा मुखी रुद्राक्ष
सहा मुखी रुद्राक्ष, प्रेम वाढवते, पती-पत्नी मधील संबंध सुधारतात आकर्षण वाढते, शुक्र ग्रहाचे दोष दूर होतात कलाकार क्षेत्रातील लोकांनां फायदा होतो, शिवकृपा प्राप्त होते.
सात मुखी रुद्राक्ष
सात मुखी रुद्राक्ष धारण केल्याने शनी चा त्रास होत नाही शनी दोष दूर होतो शनी साडेसाती मध्ये फार उपयोगी आहे.
आठ मुखी रुद्राक्ष
आठ मुखी रुद्राक्ष. हे भैरवाचे रूप मानले जाते, जो धारण करतो त्याला विजय प्राप्त होतो, गणेशाची कृपा प्राप्त होते, त्वचारोग, नेत्ररोग यापासून मुक्ती मिळते, भूत-भूतांची भीती नसते, राहु ग्रहाचे दोष दूर होतात.
नऊ मुखी रुद्राक्ष
नऊ मुखी रुद्राक्ष धारण केल्याने परात्पर माता दुर्गा शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो. याने परिधान करणाऱ्याला सहनशक्ती, शौर्य, धैर्य मिळते आणि त्याचे नाव आणि कीर्ती सर्वत्र पसरते. त्याची देवाप्रती भक्ती वाढते. त्याची इच्छाशक्ती प्रबळ असते. केतू ग्रहाचे दोष दूर होतात.शिव कृपा प्राप्त होते
दहा मुखी रुद्राक्ष
दहा मुखी रुद्राक्ष धारण केल्याने कामात प्रगती होते, स्थिरता येते हे भगवान विष्णूचे प्रतीक आहे. हे धारण केल्याने पवित्र विचार तयार होतात. अन्याय करायला मन तयार होत नाही. आपल्यावर कोणीही अन्याय करू शकत नाही, पोटाचे आणि डोळ्यांचे आजार बरे होतात. शिव कृपा प्राप्त होते.
अकरा मुखी रुद्राक्ष
अकरा मुखी रुद्राक्ष आर्थिक स्थिरता व समृद्धी देतो. रुद्राच्या अकराव्या स्वरूपाचे प्रतीक असलेला हा रुद्राक्ष धारण करणे अत्यंत शुभ आहे. त्याच्या प्रभावामुळे धर्माचा मार्ग सापडतो. धार्मिक लोकांचा सहवास मिळेल. तीर्थयात्रा होतील. देवाची कृपा प्राप्त होते
बारा मुखी रुद्राक्ष
बारा मुखी रुद्राक्ष धारण केल्याने विदेश यात्रा घडते, नेतृत्व क्षमता विकसित होते, शक्ती मिळते, बारा ज्योतिर्लिंगांचे प्रतिनिधित्व करतो. शिवाच्या कृपेने ज्ञानाचे नेत्र उघडते, नेत्ररोग दूर होतात. मेंदूशी संबंधित समस्या दूर होतात.
तेरा मुखी रुद्राक्ष
तेरा मुखी रुद्राक्ष इंद्राचे प्रतिनिधित्व करणारा आहे, मानवाला ऐहिक सुख देतो, दारिद्र्यनष्ट करतो, हाडे, सांधेदुखी, दातांचे आजार टाळतो, सर्व जण आकर्षित होतात, मोकांना पूर्ण होते, शिव कृपा प्राप्त होते
चौदा मुखी रुद्राक्ष
चौदा मुखी रुद्राक्ष भगवान शंकराचे प्रतीक. शनीच प्रकोप दूर करते, त्वचारोग, केसांचे आजार, पोटदुखी दूर करते. शिव भक्त होण्याचा मार्ग मोकळा करतो. शक्ती वाढते, अध्यात्मिक उन्नती होते, धन प्राप्ती होते.
15 मुखी रुद्राक्ष
15 मुखी रुद्राक्ष हा मंगळ ग्रहाचा दोष दूर करतो एखाद्या व्यक्तीमध्ये प्रेम, भक्ती आणि करुणा निर्माण होते. हे एखाद्या व्यक्तीला योग्य निर्णय घेण्यास आणि जीवनात योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत करते. ज्ञान, भाग्य, आत्मबल वाढवते पशुपती नाथाची कृपा प्राप्त होते
स्फटिक ब्रेसलेट
शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शांती प्रदाता मायग्रेन, आजारी व्यक्तींसाठी प्रभावी. आवश्यक मानसिक शांती प्रदान करुन राग, तणाव इ. दूर करण्यास उपयुक्त. ताप, रक्ताशी संबंधित समस्या, मायग्रेन आणि अन्य उपचारांसाठी उपयुक्त. व्यक्तिमत्व, चारित्र्य आणि अभिरुची इ. सुधारण्यास लाभदायक. उपवर मुले-मुली अथवा ज्यांचे विवाह बरेच काळ प्रलंबित आहे.
ग्रीन ॲव्हेंच्युरियन
व्यवसाय भरभराट, प्रगती व नशीबाची साथ मिळण्यासाठी. प्रगतीची दालने खुली होतात. कुठल्याही व्यवसायात कौशल्यवाढ होऊन यशप्राप्ती शक्य होते. 'कुठल्याही स्पर्धेत यशस्वी होण्याचा आत्मविश्वास देऊन, उत्कृष्ट प्रतिस्पर्धी बनण्याची जिद्द निर्माण होते. आपल्याला सदैव आनंदी राहण्याचा मुलमंत्र देण्यास उपयोगी. शेअर मार्केट, शिक्षण, लिखाण, प्रसार माध्यमे किंवा पत्रकारिता या क्षेत्रातील व्यक्तींसाठी लाभदायक, कोणत्याही स्पर्धा किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या लोकांसाठी.
कार्नेलिअन (रक्तांकित)
महिलांचे आरोग्य, गर्भधारणा तसेच सर्जनशीलतेसाठी स्वाधिष्ठान चक्र जागृत करण्याची शक्ती. सामर्थ्यवान, प्रेरणादायी, कृतिशील व निर्भय होण्यास उपयुक्त, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास उपयुक्त. आळशीपणा कमी करून, स्वतःस सादर करण्याचे कौशल्य अंगी निर्माण होते. महिलांचे मासिक पाळीचे नियमन करण्यास, रजोनिवृत्तीच्या काळात सर्वाधिक उपयोगी. आत्मविश्वासाची कमतरता किंवा इतरांच्या प्रेरणेची ज्यांना सतत गरज भासते अशा व्यक्तींसाठी उपयुक्त. कला, संगीत आणि नाटक इ. क्षेत्रात कार्यरत व्यक्तींसाठी.
पायराईट
पायराईट या रत्नाचे ब्रासलेट धारण केल्याने आपल्याकडे सर्व धन, संपत्ती आकर्षित होते. प्रसिद्धी, यश आणि नशिबाची साथ मिळते. नवीन कल्पना सुचतात. चांगले करिअर घडते. अनेक आर्थिक संधी चालून येतात. रत्न मंगळ ग्रहाला संतुलित करते.
टायगर आय (व्याघ्राक्ष)
संरक्षण, निर्णयक्षमता व प्रबळ इच्छाशक्तीसाठी मनातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास उपयुक्त. आत्मविश्वासात वृद्धी होऊन, आळस घालवून कृतिशील बनण्यास मदत होते. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास उपयुक्त असून, जीवनात स्थैर्य निर्माण करण्यास लाभदायक तणाव, नैराश्य घालवून सततचे आजारपण, नकारात्मक ऊर्जा व वाईट गोष्टींपासून संरक्षण मिळावे म्हणून उपयोगी. डिझायनिंग, अभिनय, कलाक्षेत्र, हस्तकला अशा सर्जनात्मक क्षेत्रातील व्यक्तीसाठी लाभदायक.
लॅपिस लिझुली (लाजवंती)
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, एकाग्रता व स्मरणशक्तीसाठी आत्मविश्वास वाढीसाठी. विचार शक्तीला चालना मिळण्यासाठी लाभदायक. विद्यार्थ्यांना अभ्यास व स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी लाभदायक. ज्या विद्यार्थ्यांमध्ये रणशक्तीचा अभाव व अती चंचलता आहे अशांसाठी. प्रभावी संवाद कौशल्य, नव नव्या कल्पना सुचणाऱ्या व्यक्तींसाठी उपयुक्त.
अमेथिस्ट (नील रागमणी / पद्मराग)
उत्तम आयुरारोग्य व सकारात्मकता वाढविण्यासाठी शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक प्रगती एकाग्रता, अभ्यासात प्रगती, निर्णयक्षमता व त्मविश्वास ताण-तणावापासून मुक्ती, कमी बोलणारे व पटकन निर्णय न घेऊ शकणाऱ्या व्यक्तींसाठी रक्ताभिसरण क्षमता वाढवून, शांत झोप लागणे, त्वचाविकार दूर करण्यास व आजारी व्यक्ती उपचारास प्रतिसाद देण्यास उपयुक्त दैनंदिन अनुचित प्रकारांपासून (जसे अपघात, जखम इ.) संरक्षक आर्थिक स्थिरत्व प्रदान करून, व्यवसाय, सेल्स व मार्केटिंग या क्षेत्रातील व्यक्तींसाठी उपयुक्त.
रोज क्वार्ट्ज
प्रेमाचे प्रतिक, नातेसंबंधातील गोडवा, स्नेह टिकविण्यासाठी विवाह बंधनांमध्ये बळकटी आणणे. गायन, नृत्य, चित्रकला, लेखन या क्षेत्रात उपयोगी. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी हे ब्रेसलेट अवश्य परिधान करावे. अनाहत चक्र सक्रिय करून प्रेम व सुंदरतेची अनुभूती प्रदान करण्यास उपयुक्त. जीवनात भावनिक, मानसिकदृष्ट्या स्थिरता व आशा निर्माण होण्यास लाभदायक. नातेसंबंध बिघडले अथवा एकटेपणाची जाणीव वाटत असल्यास. भावनिक जखमांवर फुंकर घालण्यास उपयुक्त तसेच मानसिक अथवा भावनिक पक्का बसलेल्या व्यक्तींसाठी.
मनी मॅग्नेट
आत्मविश्वास, आरोग्य आणि आर्थिक प्रगती करण्यासाठी मनी मॅग्नेट हे ब्रेसलेट घातल्याने आर्थिक संपत्ती वाढते. विपुल धन प्राप्त होते. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. रक्ताभिसरण वाढते. आपले संरक्षण करते. नोकरी, उद्योग आणि व्यापारात यश मिळते. वाईट विचार, नकारात्मक शक्तीला दूर ठेवते.
रेड जास्फर
क्रियाशीलता वाढविणे व आर्थिक उन्नतीसाठी उपयुक्त. मुलाधार चक्र संतुलित करुन योग्य विश्लेषक बनविण्यास उपयुक्त. चिंताग्रस्ततेवर मात करुन नीतिमान व कृतिशील बनविण्यास लाभदायक. आर्थिक परिस्थितीत सुधार करण्यासाठी उपयुक्त. अतिभावनाशील, खूप विचार करणाऱ्या व्यक्ती किंवा अति व्यावहारिक असा समतोल साधण्यासाठी प्रभावी.
ब्लॅक टुर्मूलन
अशुभ शक्तीपासून संरक्षण, मनातील अकारण भीती व व्यसनाधीनता दूर होते. नकारात्मक विचार दूर करण्यासाठी उपयुक्त. वाईट स्वजे दिसणे व मानसिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांसाठी लाभदायक. प्रयत्न आणि परिश्रमांना प्रोत्साहन देण्यास व आपल्यातील कलागुणांना योग्य वाव मिळण्यासाठी. द्वेष, चिडचिडेपणा, निराशा व ज्यांचा स्वतःवर ताबा नाही अशा व्यक्तींसाठी प्रभावी. विचारांना चालना देऊन समस्या सोडवून निर्णयक्षमतेत वाढ करण्यासाठी लाभदायक. खोल जखमेच्या तीव्र वेदनांवर वेदनाशामक म्हणून उपयोगी. कुठलाही व्यवसाय, वैद्यकीय क्षेत्र अथवा तपास यंत्रणेशी संबंधित लोकांसाठी.
लावा स्टोन ब्रेसलेट
लावा स्टोन ब्रेसलेट घालल्याने राग आणि सुस्ती नियंत्रित होते. लावा स्टोन ब्रेसलेट घालल्याने आत्मविश्वास वाढतो. लावा स्टोन ब्रेसलेट घालल्याने एकाग्रता वाढते. लावा स्टोन ब्रेसलेट घालल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते. लावा स्टोन ब्रेसलेट घालल्याने भावनात्मक रोगांवर आराम मिळतो. लावा स्टोन ब्रेसलेट घालल्याने करियर स्थिरतेस मदत होते. लावा स्टोन ब्रेसलेट घालल्याने आत्माची स्थिरता आणि ग्राउंडिंग मिळते. लावा स्टोन ब्रेसलेट घालल्याने साहस आणि ताकत मिळते.
Turquoise (निलमणी / फिरोजा)
नकारात्मक ऊर्जा दूर करून मानसिक आरोग्य आणि प्रेम प्राप्तीसाठी. नीलमणी एक शुध्दीकरण दगड आहे. हे नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि वातावरणातील बाह्य प्रभाव किंवा प्रदूषकांपासून संरक्षण करण्यासाठी परिधान केले जाऊ शकते. नीलमणी सर्व चक्रांना संतुलित आणि संरेखित करते, मूड स्विंग्स स्थिर करते आणि आंतरिक शांतता प्रस्थापित करते. हे उदासीनता आणि थकवा यासाठी उत्कृष्ट आहे, यात पॅनीक हल्ल्यांना प्रतिबंध करण्याची शक्ती देखील आहे. पिरोजा आत्म-प्राप्तीला परोत्साहन देते आणि सर्जनशील समस्या सोडवण्यास मदत करते. हे मैत्रीचे प्रतीक आहे आणि रोमँटिक प्रेम उत्तेजित करते.
सिट्रिक
आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक प्रगती साठी सिट्रिक या रत्नाचे ब्रेसलेट घातल्याने गुरुबल वाढते व्यापारात यश मिळते. सीटरीन हे पुखराज रत्नाचे उप रत्न आहे. याला सुनेला असं सुद्धा म्हणतात ज्यांना गुरुबल नाही विवाहादिक शुभ कार्य जमले आहेत त्यांनी धारण करावा यामुळे सर्व प्रकारे धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नती होते
मोती ब्रेसलेट
मानसिक शांति आणि आत्मविश्वास वाढवते. व्हाईट पर्ल ब्रेसलेट उच्च चक्रांना सक्रिय करते. नशीब सक्रिय करते, सौंदर्य वाढवते, भावनांवर नियंत्रण ठेवते. चिडचिडेपणा शांत करते, व्यक्तिमत्त्वात आकर्षण वाढवते. प्रवासातील अडथळे दूर करते, स्पष्टता देते, नातेसंबंध सुधारते. करुणा विकसित करते आणि सहज उत्पन्न मिळवते.
रुद्राक्ष ब्रेसलेट
शिवकृपा प्राप्त होते आणि सुख, समृद्धी मिळण्यासाठी. रुद्राक्ष धारण केल्याने हृदयगती नियंत्रित होते. रुद्राक्ष धारण केल्याने तणाव कमी होतो. रुद्राक्ष धारण केल्याने उच्च रक्तदाब कमी होतो. रुद्राक्ष धारण केल्याने सकारात्मकता वाढते. रुद्राक्ष धारण केल्याने अनेक समस्या आणि भीतीपासून आराम मिळतो. रुद्राक्ष धारण केल्याने भगवान शंकराची कृपा प्राप्त होते. रुद्राक्ष सकाळी स्नानानंतर धारण करावा आणि रात्री झोपण्यापूर्वी काढावा.
7 Chakra Bracelet
दैवी संरक्षणासाठी, देवाचे आशीर्वाद आणि सकारात्मक स्पंदने प्रेम, सुसंवाद आणि चांगल्या नात्यासाठी. सकारात्मकतेसाठी क्रिस्टल्स आणि 7 चक्र संतुलित. ऊर्जा असंतुलन सुधारते. मुकुट चक्रासाठी नीलम म्हणजे सहस्रार चक्र: ज्ञान, शांतता, शांतता, परिपूर्णता. थर्ड आय चक्र म्हणजेच अजना चक्रासाठी सोडालाइट: अध्यात्मिक जागरूकता, मानसिक शक्ती, अंतर्ज्ञान, स्पष्टता घशातील चक्रासाठी ब्लू लेस अगेट अर्थात विशुधा चक्रः संप्रेषण केंद्र, अभिव्यक्ती, उपचार. या चक्रातील असंतुलनामुळे थायरॉईड आणि घशाशी संबंधित आजार होऊ शकतात हृदय चक्रासाठी ग्रीन ॲव्हेंच्युरिन अर्थात अनाहत चक्र: प्रेम, करुणा, वैश्विक चेतना, भावनिक संतुलन. सोलर प्लेक्सससाठी पिवळा कॅल्साइट म्हणजे मणिपुरा चक्र बुद्धी, महत्त्वाकांक्षा, वैयक्तिक शक्ती, संरक्षणात्मक. सेक्रल चक्रासाठी कार्नेलियन अर्थात स्वाधिस्थान चक्र : सर्जनशीलता , लैंगिकता आणि पुनरुत्पादन, इच्छा, भावना, अंतर्ज्ञान. मूळ चक्र म्हणजेच मूलधार चक्रासाठी लाल जास्पर स्थिरता, ग्राउंडिंग, संरक्षण, सुरक्षा देते.
Cateye stone bracelet
केतु ग्रहाचा दुष्प्रभाव नष्ठ करते. नकारात्मक शक्ती आणि वाईट आत्म्यांपासून संरक्षण होते. तणाव आणि चिंता दूर होते, शांतता आणि मानसिक स्पष्टता वाढते. नशीब आणि आर्थिक पुनर्प्राप्तीमध्ये मदत होते. या रत्नात चॅटोयन्सी म्हणून ओळखली जाणारी एक ऑप्टिकल घटना दिसते. प्रकाशाचा एकच तेजस्वी पट्टा संपूर्ण पृष्ठभागावर जातो. सर्वात मौल्यवान कॅट्स आय स्टोनमध्ये तीक्ष्ण, सु-परिभाषित डोळा असतो.