घर हा सर्वांच्या जीवनातील महत्वाचा जिव्हाळ्याचा आणि मूलभूत गरजेचा विषय आहे. मनुष्य आणि इतर प्राणी, पक्षी सुद्धा आपले घर मोठ्या हौशी ने बांधतात. हेच घर जर शास्त्र शुद्ध पद्धतीने बांधले असेल तर अधिकच चांगले होईल.
आपले शरीर जसे पंच महाभूतांनी बनलेले आहे तसेच आपल्या घरामध्ये या पंच महाभूतांचा सम प्रमाणात प्रयोग असावा आणि म्हणून जर आपले घर १० दिवसांनी तयार होत असेल तर त्या दिशेचे विशिष्ट देवता गृह तत्व इ. असतात.
जर त्या त्या दिशेला काही दोष असेल तर त्या संबंधी आपल्याला अडचणी येऊ शकतात. १० दिशांना दोष झाल्यास त्याचे काय परिणाम घरातील सदसयांच्यावर व त्याच्या आरोग्ययावर,जीवनावर होतात ते आपण पुढे पाहू.
पूर्व दिशा
या दिशेला दोष असेल तर, घरातील मूल आणि कर्ता पुरुष यांना त्रास दायक आहे. पितृ दोष. मानसिक तनाव, मुलांचा विकास होत नाही. संतती होत नाही .गंभीर आजार, मान-सन्मान मिळत नाही. या दिशेला दोष आहेत का ते पाहून त्या वर उपाय करावे.
पश्चिम दिशा
या दिशेला दोष निर्माण झाल्यामुळे पती-पत्नी मध्ये भेदभाव निर्माण होतात. व्यापारात नुकसान होते. सुखात कमतरता येते उपाय करावे.
दक्षिण दिशा
या दिशेला दोष असता मृत्यू ,आत्महत्य ,खून ,मुलांची बुद्धी चालत नाही, मन शांत राहत नाही, व्यसनाधीनता होते. उपाय करावे.
उत्तर दिशा
या दिशेला दोष असेल तर मानसिक असंतुलन, वासना ,जास्त ईर्षा उत्पन्न होते. पैसे टिकत नाही.
आग्नेय दिशा
ही दिशा दोष युक्त असेल तर, संतती / संपत्तीची हानी होते. पती-पत्नी मध्ये प्रेम राहत नाही, कर्त्या स्त्रीला त्रासदायक आहे. या दिशेला दोष असेल तर उपाय करावे.
नैऋत्य दिशा
अस्थीरता, कर्ज, पितृदोष या दिशेला दोष असल्याने उदभवतात दोष निवारणार्थ उपाय करावे.
वायव्य दिशा
या दिशेला दोष असेल तर वाद ,कलह, संघर्ष आभ्यासात अडचणी, मन अशांत होते. त्या साठी उपाय करावे.
ईशान्य दिशा
या दिशेला दोष असेल तर पूजेमध्ये मन लागत नाही. पैशाची कमी, संतती सुख नाही, बुद्धी भ्रष्ट होते, घरात सतत आजार पण राहते. उपाय करावे दिशांना दोष आहेत कि नाही, किती आहेत आणि त्या वर काय उपाय करावे. हे चांगले वास्तू तज्ञ सांगू शकतात म्हणून तज्ञाचा सल्ला घेऊन उपाय करावेत.